महाराष्ट्राचे बजेट २०१७ - शहरी मूलभूत सुविधांवर भर
महाराष्ट्र बजेट २०१७ मध्ये मूलभूत किंवा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र राज्य भारतातील सर्वाधिक शहरी विकास असलेले राज्य आहे आणि त्यामुळे ग्रामीण व शेती बरोबरच शहरी सुविधा किंवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर साठी कशी तरतूद होईल ह्या वर लक्ष केंद्रित होते. मुंबई सारखी आर्थिक राजधानी असलेला व मोठा शहरी पट्टा असलेल्या महाराष्ट्राने, शहरीकरण व त्या मधून उत्पन्न होणाऱ्या आर्थिक विकासाला पुरेसे महत्व दिलेले दिसते. श्री. मुनगंटीवार ह्यांनी रस्ते विकसन व पुनर्बांधणी ह्यावर लक्ष केंद्रित केले आणि रु. ७००० कोटींची तरतूद केली आहे. रस्त्यांच्या विकसनातून संपूर्ण महाराष्ट्र जोडला जाईल आणि त्यामधून आर्थिक विकास होईल हे सूत्र ह्या बजेट मध्ये वापरलेले आहे. गेल्या २ वर्षात जवळ जवळ १०००० कि.मी रस्ते विकसित केले त्याच वेगाने पुढील २ वर्षे रस्ते विकसित होतील असा अंदाज आहे. तसेच वाढीव रु. ३५ कोटींची तरतूद रस्त्यांवरील होणारे अपघात टाळण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसाठी केलेली आहे. मुंबई - नागपूर हायवे जसा महाराष्ट्राला जोडू पाहतो आहे, त्याच तत्वाच्या आ...