पुणे शहराच्या विकास आराखड्या बद्दल घेतलेल्या हरकती व सूचना - मातृभाषा मराठी मध्ये
पुणे विकास आराखडा - २००७-२७ : हरकती व सूचना १. सर्व पुण्याच्या नागरिकांना existing landuse survey चे रेपोर्ट ताबडतोप उपलब्ध करून द्यावेत. हा रेपोर्ट उपलब्ध नसल्या मुळे विकास आराखड्या मधील बऱ्याच विशिष्ठ मुद्द्यांवर नागरिकांना कुठलीही हरकत घेणे किंवा सूचना देणे शक्य होत नहिये. त्या मुळे , हा रेपोर्ट उपलब्ध झाल्या नंतरच हरकती-सूचना घेण्याची मुदत निश्चित करावी ही आमची मागणी आहे. २. पुणे विकास आराखडा २००७-२७ ह्यात UDPFI (Urban Development Plan Formulation and Implementation), ह्या भारत सरकार ने प्रकाशित केलेल्या कुठल्याही बाबींचा विचार करण्यात आला नहिये. खालील काही ठोस उदाहरणे देऊन ह्या बद्दल आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो: अ) commercial land use साठी शहरामध्ये ४ ते ५ % जमिनीचे allocation असावे असे UDPFI norms मध्ये नमूद केले असताना , पुण्याच्या विकास आराखड्या मध्ये फक्त १. ३८ % एवढीच तरतूद का करण्यात आली आहे , ह्याचे स्पष्टीकरण आम्हाला द्यावे , अशी आमची मागणी आहे. commercial activity साठी कमी जागा ...