वटपौर्णिमा

This Post is for the Marathi literate only. I just could not find the right words in English to express my sentiments and opinions about an age old ritual of Vat Pournima, observed by Indian women for the long life of their husbands. This was written on the day of the Vat Pournima, but uploading it today for all the blog readers...

आज
वटपौर्णिमे च्या दिवशी रस्त्यावर असणार्‍या वटवृक्षांभोवती फेरे घालताना महिला दिसल्या आणि आपण मानव जात एखाद्या केवळ रूढी मध्ये कसे अडकून पडतो हा विचार मनात आला. काही वर्षांपूर्वी सौ. मंगला सावंत ह्यांचा 'गणपती बाप्पा मोरया' हा लोकसत्ता मधील लेख वाचला होता. त्या मध्ये मंगलाताईं नी प्राचीन भारतातील मातृसत्ताक पद्धती बद्दल लिहिले होते. इतिहास सांगतो की भारतात पूर्वी ज्या टोळ्या होत्या, त्याचे नेतृत्व बायका करायच्या. ह्या टोळ्यातील बायका जंगलात राहून आपल्या टोळीतील सदस्यांसाठी फळे, कंदमुळे गोळा करून आपला उदारनिर्वाह करायच्या. हे करित असताना काही हुषार महिलांना आयुर्वेदाचे शास्त्र समजू लागले होते व त्या जंगलातील सामग्री वापरुन रोगांवर उपचार करायच्या अस मानले जाते. खरा तर, ह्या हुषार व धाडसी बायका तत्कालीन डॉक्टरच म्हणाव्या लागतील. त्यांच्या कडे तेवढे ज्ञान व उपचार कुशलता होती असा अंदाज बांधला जातो.

अश्याच एका टोळीतील एक धाडसी महिला होती सावित्री! सत्यवानावर मनापासून प्रेम करणारी! त्या काळी विवाह संस्था नव्हती. त्या मुळे सावित्री व सत्यवान विवाह बंधनात नसावेत आणि तरीही सावित्रीला तिचा जोडीदार शोधण्याची व त्याच्या बरोबर राहण्याची मुभा होती अश्या प्रकारची समाजव्यवस्था तेव्हा होती.

आपल्याला माहीत असलेली पुढची गोष्ट अशी की एक दिवस अचानक सत्यवान जंगलात collapse होतो, व सावित्री एका अतिशय परावलंबी महिले प्रमाणे यमाची वाट बघते. यम हजर झाल्यावर सावित्री यामाकडे आपल्या ' नवरया' साठी जीवनदान मागून यमाला तिच्या खरया प्रेमाची जाणीव करून देते. ह्या 'पातीव्रते' मुळे सत्यवान परत जिवंत होतो. हे सगळे नाट्य एका वटवृक्षाखाली घडते व म्हणून त्या दिवसापासून महिलांनी वटवृक्षाचे पूजन करून आपल्या 'नवरया' साठी लांब आयुष्य मागायचे असा लौकिक आहे.

ही गोष्ट ऐकली की दोन प्रश्न मनात आल्या शिवाय राहात नाहीत. पाहिला म्हणजे, आपल्या पौराणिक कथांमधून एक सुद्धा रूढी अशी प्रस्थापित झालेली दिसत नाही ज्याच्यात एखादा तरी उपवास पुरुषाने करायचा असतो ज्याच्यामुळे त्याच्या सहचारिणिला चांगले आयुष्य लाभेल. दूसरा प्रश्न जरा शास्त्रीय भावनेतून उद्भवतो, की जर ही कथा आपल्याला सांगते आहे की सावित्री ने सत्यवानाला मृत्यु च्या तोंडातून परत आणले, तर आपण यम व त्याच्या दैवी शक्ती वर आपले तर्क का अवलंबवतो आहोत? वस्तुत:, ह्या गोष्टीवरुन मंगलाताईं नी त्यांच्या लेखातली व ईतिहासकारांनी सांगितलेली व साकारलेली "डॉक्टर सावित्री" खरी असणार! आपला सत्यवान collapse झालेला पाहुन, त्याला नक्की काय झाले आहे व आपण त्यावर काय इलाज करायला हवा, ह्याचे भान ठेवणारी ही अतिशय स्वावलंबी व हुशार बाई आपल्याला दिसु लागते.

डॉक्टर जसे रुग्णा साठी emergency मधे कार्यरत होतात, तसेच बरेच तास ह्या सावित्रीने, स्वत: च्या भावनांवर ताबा ठेवून, सत्यवानावर, एका भव्य वटवृक्षाखाली, उपचार केले असणार. कदाचित तीने ह्या अवस्थेत एखादी रात्र सुद्धा त्या वेळी जंगलात त्या वटवृक्षाच्या आडोश्‍याला काढली असेल. तिने केलेल्या उपचाराला फळ येऊन जेंव्हा तिने सत्यवानाला जागे होताना पाहिले असेल, तेव्हा अगदी सहजपणे आपल्या वर मायेची सावली देणार्‍य़ा वटवृक्षाला न विसरता तिने प्रणाम करून, आठवणी साठी स्वत: च्या पदराची एक चिंधी त्या वृक्षास बांधली असेल. प्रत्येक वर्षी त्याच दिवशी thanks म्हणण्यासाठी सावित्री व सत्यवान ह्या वटवृक्षाला भेट देत असतील, व ह्याची लोककथा होवून रूढी तयार झाली असेल.

ही शास्त्रीय बुद्धी एकदा तर्क काढायला लागली की प्राचीन काळातील आपल्या प्रगल्भ संस्कृतीची जाणीव झाल्या शिवाय राहात नाही. आणि मग, मंगलाताईं नी लिहिल्या प्रमाणे मातृसत्ताक पद्धती चे पितृसत्ताक पद्धती मध्ये रुपांतर होण्यासाठी समाजाने केलेले प्रयत्न उघड पणे दिसायला लागतात. त्या वेळी भारतात लोककथांमधून सामाजात प्रबोधन व्हायचे हे ओळखून महिला प्रधान कथांना पुरूष प्रधान करण्यात आले असणार असा अंदाज लावला जातो. महिला पुरुषाच्या मदतीशीवाय काही करू शकता नाही ही भावना बळकट करण्याचा प्रयत्न त्या वेळच्या समाजातील घटकांने केलेला दिसतो.
आज वटपौणिर्मेच्या निमित्ताने ही कथा आठवली व एखाद्या महान ऐतिहासिक रूढीचे न समजता पालन होताना बघून वाईट वाटले. मातृसत्ताक पद्धती चे पितृसत्ताक पद्धती मध्ये रूपांतर करताना तेव्हा समाजाला वाटले असेल की आपण प्रगत होत आहोत, पण ह्या 'प्रगती' मध्ये स्त्रीची व स्त्रीयांच्या अधिकारांची आधोगती होईल असा अंदाज लावणे अशक्य होते का हे मुद्दाम केले गेले हे सांगणे आज कठीण आहे. पण स्त्रीयांच्या अधिकारांच्या आधोगती मध्ये समाजाची ही आधोगती असते असा महत्वपूर्ण धडा जर आपण धेतला तरी आपली वाटचाल खर्या प्रगती कडे होईल असे वाटते.

आणि परावलंबी, कमकुवत झालेल्या स्त्रीचे रुपांतर स्वावलंबी व कर्तृत्ववान स्त्री मध्ये जेव्हा होईल तेव्हा कदाचित आजचे सावित्री व सत्यवान दोधेही त्या प्राचीन गोष्टीची आठवण काढत, वटवृक्ष जोपासून, त्याच्या भोवती एकत्र फेरे घालून एकमेकांच्या लांब व कर्तृत्ववान आयुष्यासाठी प्रार्थना करतील. 

Comments

  1. अतिशय सोप्या आणि नेमक्या शब्दात मांडले आहे..पूर्वीच्या महिला स्वावलंबी तर होत्याच शिवाय प्रसंगावधान दाखवून निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्यात होती..

    ReplyDelete
  2. पण आजही जेव्हा तुम्हा मुलींना काम करताना आम्ही जवळून बघतो तेव्हा तुमची ऊर्जा प्रतिमा प्रतिभा multi tasking मधील तूमची skills बघुन अचंभित व्हायला होत...तुमच्या offices मधे,विविध conferences मधे तुम्ही सगळ्या जेव्हा full comand नी काम करत असता तेव्हा नकळत आम्हा पुरषामधे एक प्रकारचा inferiority complex निर्माण करता आणि तुमच्या बद्दल J factor वृद्धिंगत करता..खरोखर तुम्ही सवित्र्या आमच्यापेक्षा खुप सरस असता हे प्रांजळ पणे मान्य कारावच लागेल..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Development Plan for Pune 2007-2027 - A 6 Point Agenda for Modifications

Pune's Metro - What will happen to Pune and Punekars?

The Proposed Development Control Rules (DCR) for Pune - An Analysis